छाननीनंतर वर्धा लोकसभेसाठी २६ उमेदवारांचे नामांकन वैध
किशोर कारंजेकर
वर्धा : – ०८-वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज ता.५ एप्रिल रोजी झालेल्या छाननीअंती २६ उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध ठरलेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे, १० नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार आणि १३ अपक्ष असे एकूण २६ उमेदवार वैध ठरले आहेत.
वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारात अमर शरदराव काळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), डॉ मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी), रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे. तसेच वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार अक्षय मेहरे भारतीय (अखील भारतीय परिवार पार्टी), आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी), उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी), कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदूराष्ट्र संघ), कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी), दिक्षीता आनंद (देश जनहित पार्टी), मारोती गुलाबराव उईके (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), डॉ मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया), प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी), रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) यांचा समावेश आहे.
वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये इतर म्हणजे (अपक्ष) उमेदवारात शैलेश अग्रवाल, अनिल केशवरावजी घुसे, अरविंद शामराव लिल्लोरे, आसीफ, किशोर बाबा पवार, जगदीश उध्दवराव वानखडे, पुजा पंकज तडस, ॲड भास्कर मारोतराव नेवारे, माधुरी अरुणराव डहारे, रमेश सिन्हा, राहुल तु. भोयर, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव, सुहास विठ्ठलराव ठाकरे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम ता.८ एप्रिल असून त्यानंतरच प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. ता.२६ एप्रिल रोजी मतदान होणार असून ता.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.