Breaking
ब्रेकिंग

दुचाकीसह पुलावरून वाहत गेल्याने दोघांचा मृत्यू ; बोरधरण येथील घटना

2 6 6 6 5 8

सचिन धानकुटे

सेलू : – वाहत्या पाण्यात पुलावरून रस्ता शोधण्याचे धाडस दोघांच्या जीवावर बेतल्याची घटना काल रात्री बोरधरण परिसरात घडली. दुचाकीसह वाहत गेल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आले. अंकुश नागो चौधरी(वय६२) रा. बोरी कोकाटे व इसराईल पठाण(वय५२) रा. हिंगणी अशी मृतकांची नाव आहेत.

     मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अंकुश आणि इसराईल हे दोघेही काल ता.२१ रोजी एम एच ३२ एचव्ही १३१० क्रमांकाच्या स्पेलंडर मोटारसायकलने कामानिमित्त घराबाहेर पडले होते. दोघेही सालईकडून रात्री उशिरा बोरधरण मार्गे हिंगणीच्या दिशेने परत येत होते. काल सकाळपासूनच रात्री अकरा वाजतापर्यंत बोरधरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने सालई ते बोरी मार्गावरील पुलावरून कमरेच्यावर पाणी वाहत होते. सदर पुल उतारावर आणि धरणाशेजारीच असल्याने वाहत्या पाण्याला प्रचंड ओढ होती. अशातच रात्री त्या दोघांनीही दुचाकीसह पूल पार करण्याचे धाडस केले आणि दोघेही दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 

     आज मंगळवारी सकाळच्या सुमारास बोरी येथील नागरिक नदीच्या पात्रात मासोळ्या शोधण्यासाठी गेले होते. यावेळी दोघांचेही मृतदेह पुलापासून ३०० मीटरच्या अंतरावर झाडाच्या फांद्यात अडकून असल्याचे त्यांना दिसून आले तर दुचाकी देखील नदीच्या पात्रात आढळून आली. सदर घटनेची माहिती सेलू पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. इसराईल आणि अंकुश चौधरी यांच्या अपघाती निधनामुळे हिंगणी व बोरी कोकाटे परिसरात शोककळा पसरली आहे.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे