ब्रेकिंग
वर्धेत हवालाचे साडे तीन कोटी जप्त : तिघांना नागपुरात अटक : पोलिस अधीक्षक हसन यांची कामगिरी
2
6
6
6
5
3
किशोर कारंजेकर
वर्धा : राष्ट्रीय महामार्ग ७ वरून हवालातील पाच कोटी रुपये बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना अवघ्या सात तासात अटक करण्यात वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना यश आले असून, यातील साडे तीन कोटीची रक्कम ही जप्त करण्यात आली आहे.
यवतमाळ येथे हे हवालाचे ५ कोटी रुपये घेऊन जात होते. दरम्यान हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक ताणून ५ कोटी लंपास केले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नृरुल हसन आपल्या चमुसह घटनास्थळी पोहोचले. अगदी ५ तासात चोरट्यांना पकडण्यात यश आले असून, ५ कोटी पैकी ३ कोटी जप्त करण्यात आले असून या गुन्ह्यात तांत्रिक मदत वापरण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक हसन यांनी RNN शी बोलताना दिली.
2
6
6
6
5
3