Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेतमाल गेला पावसात वाहून..! : बाजार समितीच्या शेडवर व्यापाऱ्यांचा कब्जा, शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर

1 9 7 0 2 8

सचिन धानकुटे

सेलू : – येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा उघड्यावर पडून असलेला शेतमाल कालच्या पावसात नुसता भिजलाच नाही तर चक्क वाहून गेला. त्यामुळे बाजार समितीत उभारलेल्या शेडवर व्यापाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत कब्जाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.    

    येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या शेडवर बऱ्यापैकी व्यापाऱ्यांनी कब्जा केल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल लिलावासाठी नेहमीच उघड्यावर टाकावा लागतो. परंतु जेव्हा केव्हा पाऊस पडतो, तेव्हा मात्र शेतमाल नेहमीच पावसामुळे भिजतो, प्रसंगी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. जेव्हा केव्हा असे घडते, तेव्हा तेव्हा बाजार समितीच्या शेडवर व्यापाऱ्यांचा असलेला ताबा कळीचा मुद्दा ठरतो. येथील बाजार समिती प्रशासन देखील यासंदर्भात म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीच करु शकत नसल्याने त्यांची देखील हतबलता यातून स्पष्ट दिसून येते. 

     काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यावेळी बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर पडून होता. यावेळी ताडपत्रीच्या माध्यमातून शेतमाल झाकण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आला, परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तोही तोकडाच पडला. यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जोरदार झालेल्या पावसामुळे पाण्यासोबत शेतमाल देखील वाहून गेला. हा सगळा प्रकार शेतकऱ्यांनीच आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत बाजार समिती प्रशासनाला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरले. यासोबतच नको त्या भाषेत बाजार समितीतील सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढण्यात आले.

   येथील बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षापासून महाविकास आघाडीची सत्ता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मैदानात असून शेतकरी हिताच्या गप्पा मारल्या जात आहेत. बाजार समितीत जेव्हा शेतकऱ्यांचा माल पावसात ओलाचिंब होत वाहून जात होता, तेव्हा मात्र महाविकास आघाडीची नेतेमंडळी तालुक्यातच प्रचारसभात दंग होती हे विशेष..!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे