Breaking
ब्रेकिंग

छतावरील उच्चदाब वाहिनीचा स्पर्श झाल्याने मजूर गंभीर जखमी ; फोनवर बोलता-बोलता घडली घटना ; महावितरणचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

2 6 8 0 1 2

सचिन धानकुटे

सेलू : – छतावरील प्रवाहित विज तारांचा स्पर्श झाल्याने एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शहरातील सुकळी रस्त्यावर असलेल्या आरामशीनच्या परिसरात घडली. पंकज ब्रिजलाल पंधराम(वय२२) रा. सावरी टोला ता. कुरई जि. शिवनी असे त्या जखमी मजूराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुकळी रस्त्यावर असलेल्या आरामशीनच्या परिसरात मध्यप्रदेशातील काही मजूर लाकूड कटाईच्या कामानिमित्ताने वास्तव्यास आहे. यातील सहा मजूर सकाळीच घोराड येथे कामावर निघून गेले, तर दोघे घटनास्थळीच थांबले होते. दरम्यान यातील पंकज यास फोन आल्याने तो फोनवर बोलत-बोलत गच्चीवर गेला. त्याठिकाणी फोनवर बोलत असतानाच त्याचा अचानक छतावरील उच्चदाब वाहिनीच्या प्रवाहित विज तारांना स्पर्श झाला आणि तो धाडकन गच्चीवरून खाली जमिनीवर पडला. यात त्याच्या हाताच्या बोटांना, ओठाला, गालाला, नाकाला व पायाच्या बोटांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. यावेळी अचानक धाडकन असा आवाज झाल्याने उपस्थित काहिंनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी पंकजला तत्काळ आधी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
सदर ठिकाणी खाजगी जागेतून उच्चदाब वाहिनीच्या विज तारा टाकण्यात आल्या असून यासंदर्भात स्थानिकांनी अनेकदा विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळविले. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली. सदर विज तारा वेळीच काढल्या गेल्या असत्या, तर कदाचित अशा प्रकारची दुर्घटना टाळता आली असती. याप्रकरणी महावितरणच्या एसडीओ यांना मात्र काडीमात्र कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 0 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे