मुदतबाह्य बॉम्ब निकामी करतांना स्फोट : 27 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
किशोर कारंजेकर
वर्धा : पुलगावजवळील केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटरवर एका गावाकऱ्याचा मृत्यू झाला. मुदतबाह्य बॉम्ब निकामी करतांना आज सकाळी 9 वाजता ही घटना सोनेगाव आबाजी गावाजवळ घडली.
प्रतिबंधित क्षेत्र असूनही गावाकऱ्याने प्रवेश केला होता. झाडाखाली उभा असतांना बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर लोखंडी तुकडा शिरला गावकऱ्याच्या पोटात घुसला. योगेश किशोर नेरकर, राहणार सोनेगाव आबाजी असं मृतकाच नाव आहे.
डिमॉलिश करतांना जवळपास 20 ते 25 मजूर हजर होते. देवळी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून ठाणेदार भानुदास पिदूरकर सह जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
बॉम्बचा स्फ़ोट जेव्हा होणार त्यावेळी मृतक हा लोखंडी घमेले डोक्यावर घेऊन परिसरातील हिवराच्या झाडाआड लपला होता. स्फोट होताच सुमारे चार किलोचा लोखंडी तुकडा योगेशवर आला. आधी झाडावर आदळून नंतर मृतकाच्या डोक्यात घुसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचा मृत्यू झाला हे अन्य लोखंड वेचणाऱ्या लोकांना दिसतं होते मात्र त्याला उचलण्याचे सोडून लोखंड वेचत होते.