Breaking
ब्रेकिंग

“त्रुट्या” काढून “खुट्या” मारणाऱ्या उपअधीक्षक “खोंडे”ची अखेर जिरली खोड ; भाजप पदाधिकाऱ्याच्या रुद्रावताराने “सुखदेव”ला आठवला चक्क “देव” ; सेलूच्या भुमिअभिलेख कार्यालयातील प्रकार

2 0 7 4 1 4

सचिन धानकुटे

सेलू : – येथील भुमिअभिलेखच्या कार्यालयात दाखल प्रकरणात वारंवार “त्रुट्या” काढून “खुट्या” मारणाऱ्या उपअधीक्षक “सुखदेव खोंडे”ला आज शुक्रवारी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने भरदिवसा तारे दाखवल्याची घटना घडली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्याने धारण केलेल्या रुद्रावतारामुळे उपअधीक्षक “खोंडे”ची अशी काही जिरली की, त्यांना झालेल्या चुकीसाठी चक्क सगळ्यांसमोर आपल्या चुकीची माफी मागावी लागली. सदर प्रकारामुळे बिनअकलीचा कांदा ठरलेल्या “सुखदेव”ला आज चक्क “देव” आठवल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेलूच्या भुमिअभिलेख कार्यालयात रेहकी येथील प्रफुल्ल लक्ष्मणराव चांदनखेडे यांनी मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद करण्याबाबतचे प्रकरण ता.३ मे रोजी दाखल केले होते. सदर प्रकरण ता.२ जून रोजी नामंजूर करण्यात आले. याकरिता सुची क्रमांक तीन नमुन्यात नसून त्यात मृत्यू झालेल्याच्या मिळकतीचे वर्णन नसल्याची त्रुटी अधोरेखित करण्यात आली. यासंदर्भात स्थानिक रजिस्ट्रार यांना विचारणा केली असता, सदर सुची तीनमध्ये मिळकतीचे वर्णन राहत नसून केवळ ऑनलाइन नंबर असते, तो सर्च केला की मिळकतीची संपूर्ण माहिती प्राप्त होते, यासोबतच अर्जासोबत मिळकतीचे कागदपत्रे जोडले असता सुची तीनची गरजचं नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. 

       परंतु यानंतरही “अकलीचा कांदा” ठरलेल्या उपअधीक्षक “सुखदेव खोंडे” यांनी ता.२९ जुलै रोजी परत एकदा सदर प्रकरण नामंजूर केले. यावेळी मुळ मृत्यूलेख सादर करणे व त्यातील साक्षदारांचे बयाण नोंदवणे, अशी “त्रुटी” कम “खुटी” मारून ठेवली. वास्तवात सदर प्रकरणात मुळ मृत्यूलेखाची सत्यप्रत आधीच प्रकरणात जोडण्यात आली आहे हे विशेष…

    एखाद्या प्रकरणात ज्या काही त्रुटी असेल “त्या” एकदाचं काय “त्या” ठरवून घ्यायला पाहिजेत, परंतु “सुखदेव खोंडे” हा सुर्यास्तानंतरच प्रकरणात “त्रुट्या” काढत असल्याने त्यांच्या “त्या” अवस्थेबाबत न बोललेलेचं बरे…

    भाजपचे पदाधिकारी असलेले रेहकी येथीलच राजू झाडे यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता “खोंडे”ची भामटेगिरी त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी आज शुक्रवारी सदर अर्जदाराला सोबत घेऊन भुमिअभिलेख कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी सगळा प्रकार चव्हाट्यावर आणण्यासाठी मिडीयालाही सोबत घेतले आणि उपअधीक्षक “सुखदेव खोंडे”चा असा काही खरपूस समाचार घेतला की, सुखदेवची चक्क पाचावर धारण बसली. भाजप पदाधिकाऱ्याचा तो रुद्रावतार पाहता अखेर सुची तीनच्या त्रुटीसाठी “खोंडे”ला चुक मान्य करीत अक्षरशः माफी मागावी लागली. सदर प्रकारामुळे भुमिअभिलेख कार्यालयात भरदिवसा “सुखदेव”ला तारे दिसल्याची अन् “देव” आठवल्याची चर्चा रंगली होती.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे