Breaking
ब्रेकिंग

रोटरीच्या फुकट्यांचा प्रताप : खासदार स्टेजवर नको, स्वतः मात्र लाटतात खासदारांचा पाहुणचार

2 0 8 9 8 8

किशोर कारंजेकर

वर्धा : रोटरी क्लब म्हटला की, “BIG बजेट” कार्यक्रमांचे चित्र वर्धेकरांपुढे उभे होते. पण या रोटरीची लब्धप्रतिष्ठित मंडळी किती स्वार्थी आहेत, याचा पुरावाच देणारी 37 फुकट्यांची यादीच RNN च्या हाती आली आहे. 

हो.. पण हे खरंच आहे. वर्ध्याच्या रोटरीतील 37 फुकट्यांनी दिल्ली संसद, पंचतारंकित हॉटेलचा मुक्काम मागील 27 नोव्हेंबरला आटोपला. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा सर्व खर्च आपल्या खासदारांनी केला आहे. संसद भवनात गेलेल्या फुकट्यांची नावे महेश मोकलकर, दिशा मोकलकर, आरती मोकलकर, पूर्वेश मोकलकर, मुस्तफा जाहीद, राघव व्यास, फकृद्दीन दरबार, इशांत गोविंदानी, सिमरन कृपलानी, जय शिंदे, पारस बोबडे, वंश पोद्दार, कुशल तिबडीवाल, अमिषा राजपाल, प्रिन्स साहू, सेजल पडोळे, पराग जोतवानी, मनोज मोहता, चेतन गांधी, नेहा गांधी, आसिफ जाहिद, सुशील व्यास, रुपल गोविंदानी, आशुतोष महेशकुमार, विराज मुंदडा, संकेत मुंदडा, आयुष नायडू, अर्णव केला, समीर अटमारामानी, मयंक अग्रवाल, गोविंद टवरी, नितीन शिंदे, रश्मी शिंदे, श्रीनिवास लेले, सीमा लेले, अनिल ढबाले अशी आहेत.

रोटरी या लब्धप्रतिष्ठित मंडळींच्या क्लबने राज्यपालांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण या कार्यक्रमात रोटरीवाले “दिल्ली में जीस का खाया उसीको भूल गये” खासदार रामदास तडस यांचे नावच पत्रिकेत घेतले नाही. तर माजी खासदार सुबोध मोहिते यांचे नाव पत्रिकेत होते. त्यामुळे राज्यपालांच्या व्यासपीठावर माजी खासदार सुबोध मोहिते यांना स्थान मिळाले, तर आजी खासदार श्रोत्यांत बसलेले पाहायला मिळाले.

रोटरीला खासदारांकडून कामे करवून घ्यायला हवी. दिल्लीत आदरातिथ्य पण हवे. मात्र घरच्या कार्यक्रमात ते खासदारांना खाली बसविणार तर पैसेवाल्यांना मान देणार, हे कसे, अशी प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटत आहे.

4.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे