Breaking
ब्रेकिंग

सेलूत ३५ वर्षानंतर प्रथमच शंकरपटाचा थरार..! बैलजोड्यांसाठी आकर्षक पावणेसहा लाखांचे पुरस्कार : साहसिक जनशक्ती संघटनेसह मित्र परिवाराचे आयोजन

1 9 7 0 9 6

सचिन धानकुटे

सेलू : – शिवजयंतीच्या पर्वावर साहसिक जनशक्ती संघटना तथा मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सेलू तालुक्यात भव्य शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. याकरिता पावणेसहा लाख रुपयांच्या आकर्षक अशा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ३५ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर प्रथमचं सेलू शहरात होत असलेल्या शंकरपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

      साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार नेहमीच आपल्या अनोख्या आणि अभूतपूर्व आयोजनासाठी ओळखल्या जातात. महिनाभराआधीच त्यांनी सेलूसह वर्धा शहरात भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करीत जिल्ह्यातील दोन हजार बेरोजगारांच्या हाताला काम दिले. शिवजयंतीच्या पर्वावर यावेळी त्यांनी सेलू शहरात भव्य अशा शंकरपटाचं आयोजन केलं आहे. शनिवार ता.१७ फेब्रुवारी ते गुरुवार ता.२२ फेब्रुवारी रोजी रेहकी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील लोहिया यांच्या शेतात ह्या शंकरपटाचा थरार रंगणार असून याकरिता पहिल्या पंधरा बैलजोड्यांना आकर्षक असे पावणेसहा लाखांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शंकरपटात धावणाऱ्या बैलजोड्यांसाठी १३५० फुटांची दान उपलब्ध राहणार असून यात सहभागी होणाऱ्या बैलजोडीसह त्याच्या मालकाला शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

      याप्रसंगी आयोजित उद्घाटन सोहळ्याला खासदार रामदासजी तडस, महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, माजी आमदार प्रा सुरेश देशमुख, राजू तिमांडे, सहआयुक्त विवेक इलमे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेशसिंग ठाकूर, भारत राष्ट्र समितीचे पवन तीजारे, शशांक घोडमारे, बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार, अमित गावंडे, सुधीर कोठारी, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, बाजार समितीच्या संचालक तथा कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार, वरुण दफ्तरी, उपविभागीय अधिकारी दिपक करंडे, तहसीलदार स्वपनिल सोनवणे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा धर्मेंद्र राऊत, सेवानिवृत्त तहसीलदार बी एन तीनघसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे