Breaking
ब्रेकिंग

तलाठ्याचा असाही उर्मटपणा..! शेतकऱ्यांवरचा राग अनावर झाल्याने फेकली चक्कं खुर्ची : आकोलीच्या तलाठी कार्यालयातील प्रकार

2 0 3 7 5 0

सचिन धानकुटे

सेलू : – शेतकरी सन्मान योजनेच्या पैशाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याविषयीचा राग अचानक अनावर झाल्याने तलाठ्याने चक्कं खुर्ची बाहेर फेकत आपला राग व्यक्त केल्याची धक्कादायक घटना आकोली येथे घडली. या घटनेत शेतकऱ्याला तर काही नाही झाले, मात्र त्याउलट तलाठ्याच्या हातालाच मार लागल्याने “जैसी करनी वैसी भरणी” असाच काहीसा प्रत्यय जामणी येथील शेतकऱ्याला नुकताच आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या अशा तलाठ्यावर आता कारवाईची मागणी होत आहे.

      तालुक्यातील जामणी येथील शेतकरी किशोर पांडुरंग दुधाने (वय३५) हे आकोली येथील तलाठी कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गेले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने त्याच्या चौकशीसाठी ते गेले होते. यावेळी तलाठी महाशय कार्यालयात हजर नसल्याने ते तेथीलच एका खुर्चीवर बसलेत. दरम्यान अर्ध्या तासानंतर अचानक तलाठी महाशय कार्यालयात अवतरले. यावेळी शेतकरी दुधाने आपल्या खुर्चीवरुन उठलेत आणि बाहेर वऱ्हांड्यात येवून उभे राहिलेत. याकाळात तलाठी कार्यालयात शिरले आणि त्यांनी कसलाही विचार न करता कार्यालयातील खुर्ची उचलून त्या शेतकऱ्याच्या दिशेने भिरकावली. सदर शेतकऱ्याने यावेळी मोठ्या शिताफीने तो वार चुकवला, मात्र या कांगरघाईत “त्या” तलाठ्याच्याच हाताला मार लागला. याप्रसंगी उपस्थितांवर “जैसी करणी वैसी भरणी” असे म्हणत घरचा राग आमच्यावर काढता का साहेब..! असे म्हणण्याची पाळी आली.

      एव्हाना एखाद्या शेतकऱ्याने जर असा प्रकार केला असता तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. परंतु आपल्या हक्काचे पैसे पदरात पडले किंवा नाही ह्याची साधी चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांविषयची तलाठ्यांची प्रतिक्रिया सध्या वादास कारणीभूत ठरते आहे. सध्या “त्या” तलाठ्याच्या उर्मटपणाचे किस्से अख्ख्या तालुक्यात चर्चीले जात आहेत.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे