पक्ष श्रेष्ठींसमोर समीर देशमुख यांनी मांडली रोखठोक भूमिका

वर्धा : नागपूर येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ‘साहेबांचा संदेश’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा, रोहित आर. आर. पाटिल आणि सलील देशमुख हजर होते.
यावेळी झालेल्या जिल्हानिहाय बैठकीत वर्धा जिल्ह्याबाबत युवा नेते समीर देशमुख यांनी रोखठोक भूमिका मांडली. आपली भूमिका विषद करताना समीर देशमुख यांनी सांगितले की, काही लोक तळागाळात काम न करता वारवांर मुबंईला जातात आणि जिल्ह्यातील पक्ष संघटने बद्दल चुकीची माहिती देत स्वता साठी एखाद पद घेऊन येतात. असे लोक जिल्ह्यात पक्षाच काम करत नाही तर मिळालेल्या पदाचा दुरुपयोग करून स्वताची पोळी भाजून घेतात. या सर्व प्रकारामुळे प्रामाणिकपणे कार्य करणारा वर्ग नाराज होतो. जर अस सुरू राहील तर मग निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावे. असा प्रश्न उपस्थित केला. या पुढे पक्षाने जिल्ह्यातील लोकांना विश्वासात घेऊनच पुढील नियुक्ती करावी. ही विनंती या निमित्ताने समीर देशमुख यांनी उपस्थितांना केली.
वर्धा जिल्ह्यातील कोणताही निष्ठावंत नेता आणि सहकारी मा. शरद पवार साहेबांना सोडून गेलेला नाही हे त्यांनी अग्रक्रमाने सांगितले. जे गेले ते वर्धा जिल्ह्याचे नव्हते असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाने वर्धा विधानसभा आणि हिगणंघाट विधानसभा सोबतच वर्धा लोकसभा देखील मागावी अशी आग्रही भूमिका मांडली. सोबतच इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर समीर देशमुख यांनी आपली भूमिका विषद केली. त्यांच्या या भूमिकेचे उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.
या बैठकीला जिल्हा अध्यक्ष सुनिल राऊत, माजी आमदार राजू तिमांडे, किशोर माथनकर, केसरीचंद खंगारे, आफताब खान, मिलींद हिवलेकर, गोपाळ मरसकोल्हे, ज्योती देशमुख, संदीप किटे, खलील खतीब, गुणवंतराव कडू, संजय काकडे, हनीफ सय्यद, नितीन देशमुख, धनराज तेलंग, विठ्ठल गुळघाणे, नावेद शेख, विणा दाते, शारदा केणे, अर्चीत निघडे, राहुल घोडे, संकेत निस्ताने, सुयोग बिरे, प्रवीण पेठे, हरीश काळे, नामदेव मसराम, सौरव तिमांडे आदी सहकारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.