दिपचंद चौधरी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के ; नयन रमेश देवळीकर शाळेत अव्वल
सचिन धानकुटे
सेलू : – येथील दिपचंद चौधरी विद्यालयाचा माध्यमिक शालान्त परिक्षेचा निकाल ९३.२२ टक्के लागला. यावेळी नयन रमेश देवळीकर ह्याने ९३.२० टक्के गुण घेत तो शाळेतून पहिला आला.
दिपचंद चौधरी विद्यालयातून यंदा २९५ विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालान्त परिक्षा दिली. यापैकी २७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९३.२२ टक्के आहे. यामध्ये प्राविण्य श्रेणीत ४३, प्रथम श्रेणीत ११२, द्वितीय श्रेणीत ९६ तर तृतीय श्रेणीत २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी नयन रमेश देवळीकर(४६६) ह्याने ९३.२० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला. वेदांती संजय जायदे(४६०) ही ९२ टक्के गुण घेत द्वितीय तर आदित्य उकेश चंदनखेडे(४५५) हा ९१ टक्के गुण घेत तृतीय, स्वाती भास्कर सोरते(४५४) ही ९०.८० टक्के गुणांसह चतुर्थ तर पूर्वा धर्मपाल गोडघाटे(४५३) ही ९०.६० टक्के गुण मिळवून पाचवी आली.
याप्रसंगी शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, मुख्याध्यापक सुहासिनी पोहाणे, पर्यवेक्षक विजय चांदेकर, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीनारायण पिल्ले तसेच वर्गशिक्षक व शिक्षकांनी अभिनंदन केले.