पत्रकारांच्या मागण्यांकरीता `व्हाईस ऑफ मीडिया`चे वर्ध्यात गुरुवारी गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन : आंदोलनात पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन
किशोर कारंजेकर
वर्धा : पत्रकारांच्या मागण्यांकरीता व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने वर्धा येथील गांधीजींच्या पुतळ्याजवळ ११ मे रोजी सकाळी ११ वाजता पत्रकारांचे धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
पत्रकारांकरीता स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारीतेत पाच वर्षे काम केलेल्यांना शासनाच्या वतीने सरसकट अधिस्वीकृतीपत्र द्यावे, सध्या वृत्तपत्रांना जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांकरीता विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनाच्या काळात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे शासकीय जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिके) यांना मारक आहे. लघु दैनिकांना मध्यम (ब वर्ग), दैनिकांयेवढ्याच जाहिराती देण्यात याव्यात, साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्यावा, आदी मागण्यांकरीता हे आंदोलन केले जाणार आहे.
आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा शाखेने केले आहे.