ब्रेकिंग
बोरी कोकाटे येथे विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू ; पाणी काढताना घडली घटना
2
5
4
4
4
4
सचिन धानकुटे
सेलू : – पाणी काढताना विहिरीत पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोरी कोकाटे येथे आज मंगळवारी घडली. सुनिल बाळकृष्ण सातघरे(वय३२) रा. हिंगणी असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी येथील सुनिल सातघरे नामक युवक आपल्या शेतातील कपाशीच्या पिकावर फवारणी करण्यासाठी बोरी कोकाटे येथे गेला होता. यावेळी बजरंग आदिवासी सोसायटीच्या शेतातील विहिरीतून फवारणीसाठी पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो त्या विहिरीत पडला. यासंदर्भात माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले, परंतु सदर दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.
2
5
4
4
4
4