जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे यांची दफ्तरी ऍग्रो कंपनीला सदिच्छा भेट
सचिन धानकुटे
सेलू : – खरीप हंगामात जिल्ह्याला उत्तम दर्जाचे बियाणे मिळावे, यासाठी सोयाबीन, कापूस, तूर बियाणे उत्पादन करणाऱ्या येथील दप्तरी ऍग्रो सिड्स प्रा. लि. कंपनीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज सदिच्छा भेट देत सविस्तर आढावा घेतला.
यावेळी कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, दफ्तरी ऍग्रो कंपनीचे संचालक वरुण दफ्तरी, जैनेंद्र दफ्तरी प्रामुख्याने उपस्थित होते. या भेटी दरम्यान संचालकांनी कंपनीबाबत संपूर्ण माहिती दिली. जिल्ह्यामध्ये उत्तम दर्जाचे बियाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्यात. यासोबतच वर्धा एमआयडीसी येथील विदर्भ मार्केटिंग फेडरेशन यांच्या मार्फत मंजूर झालेल्या रासायनिक खतांच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्यात.