Breaking
ब्रेकिंग

जामणीच्या पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम ; चार जणांवर कारवाई ; ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल नष्ट

2 6 7 9 5 4

सचिन धानकुटे

सेलू : – येथील पोलिसांच्या पथकाने मंगळवारी जामणीच्या पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम राबविली. या कारवाईत जवळपास ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल मोक्यावरच नष्ट करण्यात आला असून याप्रकरणी चार जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

      जामणीच्या पारधी बेड्यावर काही महिला व पुरुष हातभट्टी लावून गावठी मोहाची दारू गाळत असल्याची तसेच याकरिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल त्याठिकाणी छापा टाकला असता तेथे सोनू रणजीत भोसले नामक महिला हातभट्टी द्वारे गावठी दारुचे गाळप करताना आढळून आली. यासोबतच गुड्डू बंडू पवार, अब्बास श्यामलाल पवार आणि जयशिला प्रविण पवार असे तीघे जण कच्चा मोहा रसायन सडवा तयार करताना पोलिसांना मिळाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून लहान मोठ्या अशा २१ ड्रममधील ३ हजार दोनशे लिटर मोहा सडवा, ४० लिटर मोहाची दारु व हातभट्टीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ३ लाख ५८ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरच नष्ट केला. याप्रकरणी चारही जणांवर सेलू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमुळे तालुक्यातील दारुविक्रेत्यांत मोठी खळबळ उडाली आहे. 

     ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पोलीस अंमलदार गणेश राऊत, शरद इंगोले, तुषार भुते, अखिलेश गव्हाणे, रवींद्र रघाटाटे, अमर लाखे, विक्रम काळमेघ, मंगेश राऊत, ज्ञानदेव वनवे, दिनेश चव्हाण, कृष्णा माने, अनिकेत कोल्हे, महिला अंमलदार रुखसाना शेख आदी कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 7 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे