Breaking
ब्रेकिंग

दिडशे एकरातील सोयाबीन जळून खाक..! तुसोवाच्या “क्रोन” नामक तणनाशकामुळे शेतकरी संकटात, कृषी विभाग निद्रावस्थेत

2 6 6 6 4 9

सचिन धानकुटे

वर्धा : – तणनाशकाची फवारणी केल्याने दिडशे एकरातील सोयाबीन जळून खाक झाल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील खडकी व किन्हाळा येथे उघडकीस आला. सदर प्रकारामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामा करीत शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा आणि याकरिता दोषी असणाऱ्या तुसोवा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

       आष्टी तालुक्यातील खडकी व किन्हाळा येथील शेतकऱ्यांनी ता.६ ते ८ जुलै या दरम्यान सोयाबीनच्या शेतात तणनाशकाची फवारणी केली. याकरिता त्यांनी तुसोवा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे “क्रोन” नामक तणनाशक फवारणीसाठी वापरले. परंतु फवारणीनंतर आठ दिवसांतच सोयाबीन सडले आणि वाळायला लागले. सदर प्रकार मौजा खडकी व किन्हाळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसून आला. खडकी येथील शंभर एकरातील तर किन्हाळा येथील पन्नास एकरातील सोयाबीन जळून नष्ट झाले आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला निवेदन देत दोषी असणाऱ्या तुसोवा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

    शेतकऱ्यांनी शासन स्तरावर यासंदर्भात माहिती घेतली असता सदर तणनाशक अप्रमाणित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गुण नियंत्रण अधिकारी झोपा काढत होते की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. यामध्ये क्लोरीमुरान इथील नामक घटक हा २३ ते २६ टक्के असणं आवश्यक असताना तो केवळ ३.२४ टक्केच आहे. त्यामुळे गुण नियंत्रण अधिकारी केवळ आणि केवळ कृषी प्रतिष्ठानात जावून वसूली करण्यासाठीच आहेत का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.

 

अकोल्यातही घडला प्रकार

“क्रोन” नामक तणनाशकामुळे अकोला जिल्ह्यात देखील सोयाबीन जळाल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात तक्रारीनंतरही कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप फिरकले नसल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे