व्हॉईस ऑफ मीडियाच्या समुद्रपूर तालुकाध्यक्षपदी बादल वानकर
समुद्रपूर : – येथील विद्या विकास महाविद्यालयात पार पडलेल्या पत्रकारांच्या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी दैनिक सकाळचे प्रतिनिधी बादल वानकर यांची सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष बादल वानकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी स्थानिक विद्या विकास महाविद्यालयात आयोजित पत्रकारांच्या बैठकीला व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, सेलू तालुकाध्यक्ष सचिन धानकुटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा मेघश्याम ढाकरे, जेष्ठ पत्रकार सुधीर खडसे, प्रदीपचंद कुलकर्णी आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सर्वानुमते दैनिक सकाळचे प्रतीनिधी बादल वानकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष पदी नंदोरीचे लोकमत प्रतीनिधी बंडू बन, अमोल झाडे यांची सचिव, प्रशांत ठाकूर यांची सहसचिव, मनिष गांधी यांची प्रसिद्ध प्रमुख तथा संघटकपदी, दिगांबर तडस यांची कोषाध्यक्ष तर कार्याध्यक्षपदी गजानन गारघाटे यांची निवड करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या तालुका कार्यकारणीत जेष्ठ पत्रकार सुधीर खडसे, शांतिलाल गांधी, प्रदीपचंद कुलकर्णी, समुद्रपूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रफुल्ल कुडे, प्रफुल महंतारे, गुलाब चिंचुलकर, प्रा विलास बैलमारे, प्रा अजय मोहड, किशोर आस्कर, विलास नवघरे, क्रिष्णा धुळे, प्रदिप डगवार,
गिरड ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष निर्भय पांडे, प्रशांत भगत, संदिप शिवनकर, गुरुसिंग बावरा, प्रविण पंढरे, अरविंद येवले, भारत बैलमारे आदिंचा समावेश करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.