ब्रेकिंग
बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा, सुरगांव परिसरातील घटना
2
6
6
6
4
9
सचिन धानकुटे
सेलू : – बिबट्याने कालवडीचा फडशा पाडल्याची घटना तालुक्यातील सुरगांव मौजात काल रात्रीच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुरगांव येथील राजेंद्र वानखेडे यांची मौजा सुरगांव परिसरातील समॄद्धी महामार्गालगत शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात गाय, बैल व कालवड बांधून होती. यातील एका कालवडीचा काल बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने फडशा पाडला. सदर घटना आज सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर उघडकीस आली. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या परिसरातील शेतकऱ्यांत बिबट्याच्या सततच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.
2
6
6
6
4
9