अंधाराचा फायदा घेत फिरविला डोक्यावर सत्तूर चाकू; मारहाणीत दोन युवक गंभीर जखमी : जखमींची आईवर केला होता वार,मुलांच्या मध्यस्तीने आई बचावली : वर्ध्याच्या बहुजन नगर येथील घटना
वर्धा : वर्ध्याच्या बहुजन येथील गौतम फुलमाळी हा हातात सतूर चाकूने दोघांला मारहाण केली त्यात एक गंभीर जखमी झाला आहे.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मोठ्या भावाच्या हाताला देखील सतूर चाकूचा घाव लागला आहे. सुबुद्ध आंडे हा गंभीर जखमी असल्याने सेवाग्राम येथील उपचार घेत सुरू आहे.
वर्ध्याच्या बहुजन नगर येथील 11 मे च्या रात्रीच्या दरम्यान सुबुद्ध आंडे व त्याची आई विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बाहेर फिरत होते.तेवढ्यात आरोपी गौतम फुलमाळी हा हातात सतूर चाकू घेऊन फिरत होता.आधार असल्याने बेवारस श्वान कुत्रा त्याच्यावर भुंकत होता.त्याने कुत्र्याला चाकू फेकून मारला हे दृश्य पाहून सुबुद्ध आणि त्याची आई पाहून घराकडे जात होती.आरोपीने सुबुद्ध ला म्हटले तू क्या बोल रहा? ज्यादा बात मत कर नही तो तेरे को घाव मारुंगा? म्हणत वाद घातला तेवढ्यात सुबुद्ध चा मोठा भाऊ आला तेवढ्या वेळात आला आणि दोघांनाही सोडविण्याचा प्रयत्न केला.आरोपी गौतम कार्तिक फुलमाळी याने सतूर चाकूने सपासप वार केले आणि सुबुद्ध याला गंभीर जखमी केले.सुबुद्ध च्या आईवर ही सतूर चाकू फिरविला असता आनंद आणि सुबुद्ध यांनी हातात पकडल्याने दोघाही भावाचे बोट कापल्या गेले.दोघाही भावाने त्याच्या जवळचा सतूरचाकू हिसकला.परिसरातील नागरिकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला आणि एका भावाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.जखमी सुबुद्ध आंडे यांच्या डोक्याची नस फाटली असून याला 21 टाके लागले असून सेवाग्राम दवाखान्यात उपचार सुरू आहे.स्वतःच्या बचावासाठी आरोपी गौतम फुलमाळी यांनी बनावट तक्रार दिली.
*घटनेच्या दिवशी आरोपी गौतमने केली 2 तास हातात दांडू आणि कमरेत सतूर घेऊन परिसरात माजविली दहशत*
बहुजन नगर येथील 11 मे च्या मध्यरात्री बहुजन नगर आंबेडकर पुतळ्याजवळ हातात दांडू कमरेत सतूर घेऊन परिसरात दहशत माजविली परिसरात लग्नाच्या हल्दीचा कार्यक्रम असतांना तो तिथे जाऊन फोटोग्राफर याला माझा फोटो काढ म्हणत सतूर दाखविला.लग्न घरी आलेल्या पाहूण्याला देखील धमकविल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मेरे सात कोई खुजाता नहीं ! असे म्हणत 2 तास हातात दांडू घेऊन परिसरात माजविली दहशत या आधी देखील याच परिसरातील अनेक जणांना तलवारीचा धाक दाखविने,कोणाला दांडू मारणे,विनाकारण बाचाबाची करणे अश्या अनेक घटना घडल्याची माहिती सांगण्यात आली आहे.अश्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.