Breaking
ब्रेकिंग

सेलूत प्रथमच शंकरपटाचा थरार..! राजकारणातील विरोधक एकाच व्यासपीठावर, अनेकांच्या भुवया उंचावल्या

जंगी शंकरपटाचे थाटात उद्घाटन, भरउन्हात शेतकऱ्यांसह प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

1 9 7 0 5 8

सचिन धानकुटे

सेलू : – शहरात ३५ वर्षानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जंगी शंकरपटाचे आज रविवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी भरउन्हात शेतकऱ्यांसह आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता. याप्रसंगी सेलूच्या राजकारणातील कायदेपंडित मात्र एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्यात.

      साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या वतीने आजपासून शहरात भव्य अशा शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शंकरपटाचे संयोजक रवींद्र कोटंबकार, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, दफ्तरी ऍग्रोचे संचालक वरुण दफ्तरी, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, माजी उपनगराध्यक्ष चुडामन हांडे, मोहीचे सरपंच अमर धोटे पाटील, शंकरपट आयोजन समितीचे अध्यक्ष मारोतराव बेले, नगरसेवक संदीप सांगोळकर, सिग्नल मास्तर रघुनाथ बावणे, झेंडी मास्तर बंडूजी गोहणे, घडी मास्तर ज्ञानेश्वर लांडे, संयोजक पूंजाराम तुमडाम आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम फीत कापून सिग्नलचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना विजय जयस्वाल यांनी शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शंकरपटाचं कौतुक करीत आयोजन समितीचे आभार व्यक्त केले. तालुक्यातील बळीराजासाठी हा शंकरपट पर्वणी ठरणार असून नागरिकांनी शंकरपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, वरुण दफ्तरी, माजी उपनगराध्यक्ष चुडामन हांडे, संयोजक रवींद्र कोटंबकार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

       उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच दोन बैलजोड्यांना प्रारंभिक स्वरूपात सोडण्यात आले. यात माजी पंचायत समिती उपसभापती मारोतराव बेले यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी पुरुषोत्तम तळवेकर यांची “बजरंग शेरु” नामक जोडी हाकलली. त्यानंतर दुपारी चार वाजता काटोल धोटीवाडा येथील राहुल चोपडे यांची “बलवंत बादशाह” तर कान्होलीबारा येथील रवींद्र गव्हाळे यांची “रॉकेट टकल्या” दाणीत धावल्या. शंकरपटाचा आजचा थरार संपला असून उद्या सोमवारी सकाळी नव पुन्हा नव्या जोमाने नव्या दमाने विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील बैलजोड्या धावणार आहेत. आज शेवटच्या सत्रात माजी आमदार राजू तीमांडे यांनी शंकरपटाच्या स्थळाला भेट देऊन आढावा घेतला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे