Breaking
ब्रेकिंग

हिंगणघाट शहरातील नॅनो पार्कात देहव्यापाराचा अड्डा ; एका महिलेसह तीन जणांना अटक : पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई

2 5 4 4 4 7

सचिन धानकुटे

वर्धा : – हिंगणघाट शहरातील नॅनो पार्कमध्ये एका घरात अवैधरित्या चालणाऱ्या देहव्यापाराच्या अड्डयावर पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने कारवाई करीत एका महिलेसह तीन जणांना अटक केली. या कारवाईत वाहनासह १० लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे सदर प्रकार एका महिलेकडुनच सुरू असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील अनैतिक कारभारासह अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी क्राईम इंटेलिजन्स पथकाची निर्मिती केली. त्यामुळे नागरिक थेट अवैध कारभाराची माहिती पोलीस अधीक्षकांना देतात आणि लगेच कारवाई होते. हिंगणघाट शहरातील शहालंगडी रस्त्यावर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरात एक महिलाच महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता त्याठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ती महिला मुली तसेच महिलांकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या कारवाईत मंगेश दिलीप सुके, उमेश नारायण कोटकरसह संबंधित महिलेस ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपी मंगेश सुके हा आपल्या महागड्या फार्च्युनर वाहनातून ग्राहकांना संबंधित ठिकाणी आणून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी एम एच ३१ डिएक्स ५२ क्रमांकाची फार्च्युनर, पाच महागडे मोबाईल, पाचशे रुपयांच्या तीन नोटासह १३ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १० लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीनही आरोपी विरोधात हिंगणघाट पोलिसांत भादंवि कलम ३७०(२), ३७०(अ) सहकलम ३, ४, ५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व त्यांच्या चमूने केली.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे