ब्रेकिंग
वादळवाऱ्यात शेतातील सोलर पॅनल जमीनदोस्त, महिला शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान
2
5
4
4
4
4
सचिन धानकुटे
सेलू : – वादळवाऱ्याने शेतातील सोलर पॅनल जमीनदोस्त झाल्याची घटना तालुक्यातील वघाळा येथे घडली. यात महिला शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
सेलू तालुक्याला सोमवार ता.१५ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठा फटका बसला आहे. वघाळा परिसरात शेतातील मोटारपंपासाठी लावलेल्या सोलर पॅनलची कॉन्ट्रॅक्टर पेटी तोडून जवळपास दहा पॅनल जमीनदोस्त झालेत. यात महिला शेतकरी अमिता चरडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी नुकसानीनंतर साझ्याचे तलाठी यांनी शुक्रवारी घटनास्थळाचा पंचनामा करीत यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. महिला शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
2
5
4
4
4
4