Breaking
ब्रेकिंग

मोपेडसह १ लाख १० हजारांचा दारुसाठा जप्त ; एकास अटक

2 6 6 6 1 5

राहुल दारुणकर 

हिंगणघाट : – येथील पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत मोपेडसह १ लाख १० हजार रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नयन नारायण दंडवते(वय२७) रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट यास अटक करण्यात आली.

     हिंगणघाट शहरात एम एच ३२ एयू ६८७७ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोपेडवर दारुसाठा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शास्त्री वार्डात सापळा रचला आणि यात “नयन” मोपेडवर विनापरवाना दारुची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून देशी दारुच्या ९० मिलीच्या ३०० शिश्या आणि एक मोपेड असा १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि नयन दंडवते यास याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने सदर दारुसाठा हा दारोडा येथील सूरज उर्फ शेऱ्या पिंपळकर ह्याचा असल्याचे सांगितल्याने त्याच्यावर देखील महाराष्ट्र दारुबंदी कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

     ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक होमकांत मशाखेत्री, जगदीश चव्हाण, स्वपनिल जिवने, भारत बुटलेकर, मंगेश वाघमारे, राजेश निवल, आशिष नेवारे आदि कर्मचाऱ्यांनी केली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे