Breaking
ब्रेकिंग

बांधकाम विभागातील `ही` मोजणीपुस्तकेच… कार्यकारी अभियंता पेंदे, सहकार्‍याच्या गैरकारभाराची गाथा : सीईओ किती दिवस कोंबडे झाकणार, वाचा फुटीचा दिवस तर उगवणारच

1 8 2 0 3 5

किशोर कारंजेकर

वर्धा : जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता विवेक पेंदे यांच्या तसेच त्यांच्या मर्जीतल्या कनिष्ठ अभियंत्यांनी मोजणी पुस्तकात केलेल्या कार्यवैभवाने गाजत असून बांधकाम विभागातील काही मोजणीपुस्तके आता सार्वजनिक झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याला संरक्षण देत कितीही कोंबडे झाकले तरी भ्रष्टाचाराचे कोंबडे बाग देणारच आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता रोहन घुगे हे कारवाईचे ध्वजारोहण करीत कार्यकारी अभियंता पेंदे याला आवर का घालू शकले नाही, हाच आहे. याबाबत बांधकाम विभागात खदखद आहे. नियमित कनिष्ठ अभियंत्यांना विना कामाने बसवून त्यांना वेतन देत कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याकडून कामे करून घेत पाहिजे तशी बिले काढण्याचा सपाटा कार्यकारी अभियंता पेंदे याने चालविला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्लंबरला टेंडरक्लर्कची जबाबदारी सोपविण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची संमती होती काय, याचा खुलासा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी करणे आवश्यक आहे. मुख्यालयातील सर्व इमारतींची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटी अभियंत्यांवर सोपविण्याचा प्रकार वर्धा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच घडला. या प्रतापाला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संमती होती काय, असेही विचारले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी पंचायत समित्याचा कारभार दुरुस्त करण्याचे बोलतात. पण मुख्यालयात पेंदे सारख्या दिवाभित उल्लूमशालांनी घातलेला धुडगूस त्यांना कां दिसत नाही, हाच प्रश्न समोर आहे.
यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कारंजा उपविभागातून मलमकर नावाच्या कनिष्ठ अभियंत्याची उचलबांगडी केली होती. येथे पेंदे याचा विवेक जागा झाला. त्यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची बदली होईपर्यत वाट पाहाली, आता त्याला कारंजातच कायम ठेवून त्याच्याकडून पाहिजे तशी कामे करून त्याच्या नोंदी मंजूर करण्याचा सपाटा लावला. हे सारे काय नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याला दिसत नाही? पेंदे च्या कागदावर क्षणात मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाक्षरी करतात, असे पेंदेच बाहेर सांगतात. यातून विवेकी कारभाराचे ध्वजारोहन होत आहे. हे सारे बांधकाम विभाग पाहातो.मलमकर कनिष्ठ अभियंता कारंजात कार्यरत असताना विवेक पेंदे उपअभियंता होते. ते जिल्हाबाहेर गेलेच नाही. हे लागेबांध आर्वीच्या वनस्कर सोबतही आहे. तसाच स्नेहबंध बांधकाममधील शेरजेचाही आहे. नियमित कनिष्ठ अभियंता खोटी बिले रेकॉर्ड करीत नसल्याने त्यांच्यावर पेंदेची खप्पा मर्जी आहे.
मोजणी पुस्तकातील नोंदीची तपासणी केली असता नजर विस्फारून जावी असेच सारे कारभार आहेत. तूर्तात तीन मोजणीपुस्तकांच्या झेरॉक्स प्रतीतील आढावा घेतला तरी या नोंदी कनिष्ठ अभियंता तसेच पेंदेच्या कारभारातल्या गल्लाभरू कारभारावर शिक्कामोर्तब होते.
यातील एक मोजणीपुस्तकाचा क्रमांक ७०२० आहे. दुसर्‍या मोजणीपुस्तकाचा क्रमांक ७५९८ असून याशिवाय काही मोजणीपुस्तकांच्या झेरॉक्स प्रति हाती आल्या आहेत. त्यातील नोंदी क्रमश: तपासून घेतल्या जात असतानाच ज्या धक्कादायक बाबी समोर यायला लागल्या आहेत. त्यावर जिल्हा परिषदेत संरक्षण देत कारवाई झाली नाही तरी हे थेर भष्ट्राचार व लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे सोपविले जाणार आहेत. त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसमोरही ठेवले जाणार आहेत. त्यात अलीकडेच भूखंड खरेदीच्या ५० लाखांच्या ऍडव्हान्स व्यवहाराची माहितीही दिली जाणार आहे.
७ डिसेंबरला कार्यकारी अभियंता पेंदे याने या मोजणीपुस्तकातील पान क्रमांक ४४ वर स्वाक्षरी केली. कारंजा उपविभागातील हा कारभार आहे.`मीच कामाची मापे घेतली आणि नोंदविली`, असे लिहित कनिष्ठ अभियंता स्वाक्षरी करतो. देयक काढण्याची लगबग अशी की सात डिसेंबरलाच `चेक अ‍ॅण्ड फाऊंड करेक्ट`ची पेंदे महाराजांची स्वाक्षरी होते. हे पेंदे कोणत्या वाहनाने काम तपासणीस गेले होते, त्याच्या गाडीच्या लॉगबूकची प्रत पाहता, दौर्‍याची कोठलीही नोंद मिळत नाही. एका मोजणीपुस्तकातला कारभार आहे. या चेक अ‍ॅण्ड फाऊंड करेक्टची चिरफाड क्रमाने केली जातानाच नजर विस्फारते. पण आपले काहीच बिघडत नाही, या गुर्मीतून सारे सुरू असल्याने हा प्रकार बिनधास्त सुरू आहे. ८०६७ क्रमांकाचे मोजणी पुस्तक उघडून पाहिले तर सामान्यांनाही भोवळ येईल. ७५९८ क्रमांकाच्या मोजणी पुस्तकातील मोजमापे स्नेही पण आर्वीत असताना सेलू पंचायत समितीतील कामे पाहणार्‍या कनिष्ठ अभियंत्यांनी नोंदविली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या डोळ्यातून हे नक्षीकामाचे काढलेले चित्र कसे सुटते, याचे उत्तर येणे आवश्यक आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 8 2 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे