मद्यधुंदीचे व्हिडीओ काढणाऱ्या प्राचार्य राज्या जाधवराव चोटेवार याचे विश्वासघाती म्हणून नामकरण : व्हिडीओत असणाऱ्या प्रत्येकाने फोन करून “राज्या”चा वाजविला बाज्या : मद्यधुंदीचे व्हिडीओचे RNN वर प्रसारण
किशोर कारंजेकर
वर्धा : प्राचार्य राज्या जाधवराव चोटेवार याला मित्रांचे व्हिडीओ काढणे आत्ता चांगलेच महागात पडणार आहे. मद्यधुंदीचे वृत्त प्रकाशित झाले आणि प्राचार्य “राज्या”चा बँड वाजला. वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील जेही डॉक्टर, मुख्याध्यापक त्या व्हिडीओत आहेत, त्या सर्वांनीच प्राचार्य “राज्या”चा खरपूस समाचार तर घेतलाच पण त्याला “विश्वासघाती” ही पदवीही प्रदान केली.
डॉ. गज्या खोटेवर आणि प्राचार्य राज्या चोटेवार यांच्या “चॅप्टर”कीचे दररोज किस्से RNN कडे आणून दिले जात आहे. काहीच दिवसांपूर्वी अत्यंत बेवडा प्राचार्य “राज्या” याने आपल्याच मित्रांचे नको त्या अवस्थेतील व्हिडीओ काढले होते. आम्हाला प्राप्त या व्हिडीओत सेलू तालुक्यातील दोन मुख्याध्यापक नंगा नाच करित आहेत. सोबतच सेलूत प्रॅक्टिस करणारा एक झोलाछाप डॉक्टर व त्याचा वर्धा शहरात मालक असलेला जेष्ठ बाल रोगतज्ज्ञ डॉक्टर (@ शास्त्री चौक) हे पण मद्याचे ग्लास उंचावत नाचत आहेत.
या व्हिडीओच्या आधारावर RNN ने वृत्त प्रकाशित केले आणि अनेकांचे चारित्र्य चव्हाट्यावर आले. मग ज्यांना जी भाषा येते, त्या भाषेत प्राचार्य “राज्या”ची खरडपट्टी काढणे सुरू झाले. कारणही तेव्हढंच मेजर होतं.. त्या व्हिडीओत राज्या तर नाहीच पण “राणी”ही नाही. मग राग तर येणारच. प्रत्येकाने व्हेज, नॉनव्हेज भाषेत प्राचार्य “राज्या”चा समाचार घेतला.