गजाभाऊच्या कार्यक्रमावर जनतेचा बहिष्कार : बातमी वाचून “गजा” तसाच असल्याची व्यक्त केली “मनीषा”
किशोर कारंजेकर
वर्धा : आमच्या चॅनलने अमृत महोत्सवी संस्था हडप्या डॉ. गजानन कोटेवार याची खंडणी वसुलीची बातमी टाकताच जिल्ह्यात खळबळ उडाली. सर्व कोटेवार हा असाच इसम असल्याचे सांगितले. हे माहीत झाल्यावर आमदार अभिजित वंजारी, डॉ. डी. के. अग्रवाल व अन्य मान्यवरांनी येण्याचे टाळले. तर जे आले त्यांनी प्रवासखर्च म्हणून २५ हजार रुपये घेतले असल्याने त्यांचा नाईलाज झाला.
कोटेवार याने धमकावून प्राचार्य जाधव यांना सत्कार घेण्यास भाग पाडल्याचे प्राध्यापक बोलतात. त्यासाठी जबर खंडणी वसूल करण्यात आली. ही बाब बाहेर फुटली, म्हणून काही पत्रकारांनी त्यांना जाहिरात देण्याची विनंती केली. तेव्हा याने चार पेपरला जाहिरात देवू शकतो. तुम्ही ठरवा असे पत्रकार संघटनेस सांगितले. ही बाब पत्रकारांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार होता. ते ओळखून संघटनेने या नेहमी दलाली करणाऱ्या कोट्याचा डाव हाणून पाडला.
चर्चा सुरू झाल्याने आजच्या कार्यक्रमावर अनेकांनी बहिष्कार टाकला. लोकं येण्याची वाट बघून थकलेल्या डॉ. जाधव यांनी कोट्याची समजूत काढत कार्यक्रम सुरू करण्याचा आग्रह धरला, असे समजले. आता शाळेतील शिक्षक, जबरीने बोलवलेले विद्यार्थी व चपराशी बंधू हेच उपस्थित असल्याचे दिसून आले. खंडणी दिलेले सर्व आता हसत हसत कोट्याचा रडका चेहरा पाहत आहे. धन्य कोट्याची, असं करू नको रे बाबा. आता ग्रंथालय संघाचा एका पत्रकाराने मागितलेला हिशोब चुपचाप देवून टाक.