ब्रेकिंग
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
2
6
6
6
6
0
वर्धा : – हिरापूर तळणी येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली. कृष्णराव गणपतराव कुंभारे(वय४५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक शेतकरी कुंभारे यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे त्यांच्या हेच साधन होते. परंतु सततची नापिकी आणि शेतमालाला मिळत नसलेल्या हमीभावामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. या कारणांमुळे ते नेहमी चिंतेत असायचे. त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँक तसेच कृषी केंद्राचे असे मिळून एकूण पाच लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आज रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
2
6
6
6
6
0