Breaking
ब्रेकिंग

वर्ध्याच्या आसाम टी कंपनीत रांजणगावातून येतोय सुगंधित तंबाखू आणि गुटखा : “पांढऱ्या” नारायण चुण्याच्या आड पप्पी उपाध्येचा “काळा” धंदा

2 4 6 2 0 9

किशोर कारंजेकर 

वर्धा : वर्ध्याच्या “नारायण चुना” आणि आसाम टी कंपनीत येणारा सुगंधित तंबाखू आणि गुटखा हा मध्य प्रदेशातील रांजणगाव येथून येत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पांढऱ्या” नारायण चुण्याच्या आड पप्पी उपाध्येचा “काळा” धंदा अन्न व औषधं प्रशासन आणि पोलीस विभागाला आव्हान देत आहे.

गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रीचा गोरखधंदा उपाध्ये कंपनी आपल्या “नारायण चुना” या मुख्य व्यवसायाचा आडोसा घेऊन करित आहेत. “नारायण चुना” हा उपाध्याय बंधुचा एक नंबरचा व्यवसाय. मसाळा येथे हा चुना बनविला जातो. तेथूनच या चुन्याची चिल्लर व ठोक विक्री होते. दर आठवड्यात नारायण चुना रांजणगाव येथे पाठविला जातो. मग त्याच वाहनातून तंबाखू आणि गुटखा हा पप्पी उपाध्ये आपल्या आसाम टी कंपनी या प्रतिष्ठानमध्ये आणतो. झटपट श्रीमंत होण्याची मनीषा बाळगणारे प्रफुल्ल उपाध्ये यांनी सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू केली आहे. रांजणगाव येथून स्मगलिंग करून आणण्यात आलेला तंबाखू आणि गुटखा नारायण चुना फॅक्ट्रीच्या गोदामातच ठेवण्यात येतो. 

पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकत सुरू असलेला तंबाखू आणि गुटख्याचा काळा बाजार लवकरच चव्हाट्यावर येणार हे आता काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 6 2 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे