रेहकीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगची अनोखी सौगात ; शिक्षकदिनी सामाजिक संघर्ष संघटनेचा स्तुत्य उपक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा उत्साह वाढावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्यात आल्यात. स्थानिक सामाजिक संघर्ष संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत हा स्तुत्य उपक्रम राबविला.
रेहकी येथील सामाजिक संघर्ष संघटना ही समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत बिकट असून अनेक शाळा पटसंख्येअभावी शेवटच्या घटका मोजत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळात गरीब तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुलेचं शिक्षण घेतात. त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिक्षकदिनाचे औचित्य साधत सामाजिक संघर्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांना स्कूल बॅग भेट देण्यात आल्यात. यावेळी जवळपास ७२ विद्यार्थ्यांना ही अनोखी भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. याप्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर तुरक, शिक्षक निवृत्ती शेळके, अनिल फुलमाळे, शिक्षीका संध्याताई गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सामाजिक संघर्ष संघटनेचे संघटक दिपक घुमडे, अध्यक्ष गजू बोरजे, उपाध्यक्ष सौरभ धानकुटे, सचिव गौरव शिंदे, सहसचिव अनिकेत शिंदे, वैभव धाबर्डे, सुरज शिंदे, गणेश ढबाले, प्रज्वल धानकुटे, रुपेश मुंगले, सागर लाडे, अभिषेक धाबर्डे, सागळ शिंदे, प्रशांत नान्हे, रोहित नेहारे, तेजस धुर्वे, मुकेश धाबर्डे, संदेश धाबर्डे, योगेश वाघमारे, मोंटू कांबळे, सुरज तिमांडे, प्रशांत शिंदे, श्रेयस बडवाईक, विक्की झाडे, निलेश पाटमासे, सतिश इवनाते, रोशन हुडे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.