Breaking
ब्रेकिंग

आर्वी लहान येथील गावठी दारुची भट्टी उध्वस्त ; तीन जणांवर कारवाई

1 9 7 0 5 5

सचिन धानकुटे

सेलू : – येथील पोलिसांच्या पथकाने आर्वी लहान येथील गावठी दारुची भट्टी उध्वस्त करीत २४८ लीटर मोहा रसायन सडवा नष्ट केला. याप्रकरणी तीन जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

     सुकळी(स्टेशन) नजिकच्या आर्वी लहान शेतशिवारातील नाल्याच्या काठावर दोन इसम हातभट्टी लावून गावठी दारू गाळप करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सदर ठिकाणी आज शनिवारी छापा टाकला असता अजय गणेश नान्हे(वय२३) रा. आर्वी लहान व रवींद्र शामराव कळमकर(वय५०) रा. सुकळी(स्टेशन) हे दोघेही गावठी दारू गाळताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २२४ लीटर कच्चा व उकळता मोहा रसायन सडवा व दारू गाळपाचे साहित्य असा एकूण १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मोक्यावरच नष्ट केला. याप्रकरणी अजय नान्हे, रवींद्र कळमकर व प्रविण आत्माराम थुल रा. सुकळी(स्टेशन) या तीन जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे आदि कर्मचाऱ्यांनी केली.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे