Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक ! एनएचएम कर्मचाऱ्यांना नियमित ऑर्डरसाठी दलालाकडून १ लाखाची वसुली : शासन गांभीर्याने घेतील तरी कधी?

2 6 6 6 4 4

किशोर कारंजेकर 

वर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेची ऑर्डर मिळवून देण्याचे कारण पुढे करून दलाल कर्मचाऱ्याकडून १-१ लाख रुपयाची मागणी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे व्हॉइस कॉल Rnn कडे प्राप्त झाले आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष देण्याची निर्माण झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात 318 कंत्राटी कर्मचारी कायम होणार आहेत. त्यामुळे किमान तीन कोटीचा अपहार यात झाला किंवा होणार हे आता स्पष्ट झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत हजारो कर्मचारी गेल्या १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाने कार्यरत आहेत. कोरोना काळात व इतर आरोग्यबाबत सर्व सेवा देतांना हे कर्मचारी जिवाची बाजी लावून तुटपुंज्या वेतणावर काम करीत आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना नियमित सेवेत समावून घेऊन स्थिर जीवन द्यावे, अशी मागणी हे कर्मचारी मागील ३-४ वर्षांपासून करीत आहेत. २५ ऑक्टोम्बर ते ३० नोव्हेंबर ह्या कालावधीत ४० ते ४५ दिवस चाललेल्या काम बंद आंदोलनामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी मुंबईच्या आझाद मैदानावर सदर कर्मचारी यांना ३० टक्के दरवर्षी व ७० टक्के सरळसेवेतून घेणार असे आश्वासन दिले. त्याच बरोबर १० वषपिक्षा जास्त सेवा दिलेल्या कर्मचारी यांना सिनियरीटीनुसार अगोदर समावून घेणार, असे आश्वासन सुद्धा दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय बैठक क्र.-२८२३/प्र.क्र.४३०/आरोग्य-७ नुसार केला असून १० वर्षावरील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिक्त होणाऱ्या पदावर ३० टक्के नुसार सर्व तांत्रिक /अत्रांत्रिक केडरना सामावून घेण्याबाबत शासन निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरात कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

या समायोजनाबाबत आयुक्त कार्यालय मुंबई व जिल्हास्तरावर आरोग्य विभागात तातडीने आघाडीवर काम सुरु असून सर्व कर्मचारी यांचा डाटा सुद्धा आरोग्य विभागाचा तयार आहे. मात्र आरोग्य विभागातील काही दलाल महिला कर्मचारी ह्यांना हातात घेऊन प्रत्येकी १ लाख रुपये जमा करा, जे एक लाख रुपये देतील त्यांचीच नियमित ऑर्डर येईल अन्यथा बाकी लोक डावलले जातील, आमची मंत्रालयात ओळख आहे. तिथून हे काम होणार आहे, अशा धमक्या देऊन हे कर्मचाऱ्यातील दलाल पैशाची मागणी करीत आहेत. काहींनी अगोदर १-१ लाख रुपये जमा केले असून काही कर्मचारी देत नसल्यामुळे १५-१५ हजार अगोदर द्या काहींनी ५० ते ६० हजार द्या उर्वरित नंतर ऑर्डर दाखविल्या नंतर बाकी पैसे द्या! अशी मागणी प्रत्येक कर्मचारी यांना प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे केली जात आहे. काहींनी या पैश्याला १५ नारळे द्या, ५०-६० फुले द्या १०० नारळ द्या, असे शब्द सुद्धा दिले आहेत. याबाबत वर्धा जिल्ह्यात गुप्त बैठका सुद्धा झाल्या आहेत. मात्र हा सर्व पैसा कुठे जाणार आहे आणि कोण मागत आहे, कुणाला द्यायचा आहे, हे स्पष्ट केल्या जात नाही. काही कर्मचारी यांनी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यासोबतचे कॉल सुद्धा रेकॉर्ड केले आहेत. मात्र या बाबत जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांना विचारणा केली असता सर्व शासकीय प्रक्रिया नियमाने व चोखरित्या सुरु असून कुणालाही एक रुपया सुद्धा द्याव्याचा नाही, अशी माहितीही समोर येत आहे. कर्मचाऱ्यांनी पैसे मागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार द्यावी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी रोहण घुगे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार द्यावी, तक्रारकर्त्यांचे नावे गुप्त ठेवण्यात येतील, अशीही माहिती सांगण्यात येत आहे. मात्र गरीब कर्मचाऱ्यांना पैसे मागणाऱ्याना दलाल कर्मचारी यांना धडा शिकवावा, अशी मागणी सुद्धा काही कर्मचारी करीत आहेत.

 

पुढील भागात वाचा : “अन्न हेच पूर्ण ब्रम्ह”… 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे