Breaking
ब्रेकिंग

आष्टी – मोर्शी रोडवर अपघातात दोन युवकांचा म्रुत्यु : लहान आर्वी आणि पोरगव्हाण गावावर शोककळा

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

आष्टी (शहीद) :- आष्टी-मोर्शी रोडवर मोटरसायकलने अपघात होऊन लहान आर्वी आणि पोरगव्हाण येथील दोन युवकांचा म्रुत्यु झाला.

सविस्तर व्रुत्त असे की, आष्टी-मोर्शी रोडवर दुपारी अंदाजे ४ वाजताचे दरम्यान लहान आर्वी येथील सदानंद केशव आरण (वय २५ वर्षे) हा आष्टी वरून लहान आर्वी कडे जात असतानाआणि पोरगव्हाण येथील मंगेश ऊर्फ बोबल्या सुरेश बोरीवार (वय ३५ वर्षे) हा लहान आर्वी येथील विहीरीचे कामावरून पोरगव्हाण गावात जाण्यासाठी आष्टी कडे जात असताना मोटार सायकलची एकमेकांना जबरदस्त धडक लागल्याने दोघांचाही जोरदार अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही मोटरसायकल २५ ते ३० फुट फेकल्या गेले. यामध्ये मंगेश उर्फ बोबल्या सुरेश बोरीवार हा घटनास्थळी मरण पावला. तर सदानंद केशवराव आरण हा आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्यावर उपचारादरम्यान मरण पावला.

ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा करून दोन्ही म्रुतदेह आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. दोन युवकांपैकी पोरगव्हाण येथील युवक विवाहीत असुन त्याला लहान मुलगा असलेल्याचे बोलले जात आहे.तर लहान आर्वी येथील युवक अविवाहित असुन वडीलांना एकुलता एक मुलगा होता. यामुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे