Breaking
ब्रेकिंग

काँग्रेसची लाडक्या बहिणींना साड्यांची सौगात..! ग्रामीण भागात काँग्रेसच्या चॉकलेट पॅटर्नची खमंग चर्चा

2 6 8 5 6 3

किशोर कारंजेकर 

वर्धा : – काँग्रेसच्या जिल्ह्यातील एका नेत्याने ग्रामीण भागातील महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यांना नुकतीच साड्यांची सौगात भेट दिली. काँग्रेसच्या “या” चॉकलेट पॅटर्नची सध्या ग्रामीण भागातील महिलांत खमंग चर्चा रंगली आहे.    

   राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” आणली. नुसतीच योजना आणली नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात महिन्याकाठी पंधराशे रुपये जमा केलेत. आजतागायत लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकारच्या या योजनेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतलायं. त्यामुळे आपणही लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी काही तरी उपाय शोधला पाहिजे, या विवंचनेत असणाऱ्या जिल्ह्यातील एका काँग्रेसच्या नेत्याने महिलांना साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला. 

    “त्या” नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय ग्रामीण भागातील महिलांना साड्यांची सौगात भेट दिली जात आहे. नवरात्री, दसरा व दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच महिलांना साडी भेट दिली जातेयं. “त्या” साड्यांवर काँग्रेसचे निवडणुक बोधचिन्ह असल्याने मात्र लाडक्या बहिणींच्यात एक वेगळ्याच प्रकारची चर्चा रंगलीयं. महिलांना दिल्या जाणाऱ्या या साड्या दर्जाहीन असून त्याचा उपयोग कापसाच्या गाठोड्यासाठी देखील होणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या महिला भगिनींकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुती की महाविकास आघाडी अशी द्विधा मनस्थिती महिलांसमोर उभी ठाकली आहे. ग्रामीण भागातील महिलांत काँग्रेसच्या “या” चॉकलेट पॅटर्नची सध्या खमंग चर्चा रंगली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 5 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे