Breaking
ब्रेकिंग

आशिष मोहोड करणार आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र : युवक काँग्रेसची धुरा स्वीकारणार ?

2 6 8 5 6 4

वर्धा : सध्या सर्वच पक्षांनी विधानसभाच टार्गेट केले आहे. त्याच गतीने हालचाली होतांना दिसताहेत. काँग्रेसने लोकसभेत आपला हक्क गमावला, पण आता वर्धा विधानसभा गमवायची नाही, म्हणून युवकांची फळी मजबूत केली जाताहेत. युवक काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची गरज म्हणून शिवसेनेच्या युवासेनेचे वर्धा शहरप्रमुख आशिष मोहोड यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या काही दिवसात ते ऊ. बा. ठा. शिवसेनेच्या युवासेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आशिष मोहोड हे मागील 10 वर्षांपासून युवासेनेत सक्रिय पदाधिकारी म्हणून काम सांभाळत असून आकोली गावानजीक असलेल्या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जातीचे प्रमाणपत्रही मिळवून दिले आहे.

आशिष मोहोड यांच्याकडील गणेशोत्सवाच्या स्नेहभोजन समारंभात काँग्रेस नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. त्याच चर्चेत युवक काँग्रेसची धुरा घेण्याचा आग्रह केला होता. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 5 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे