मै मर रही हू..! इंस्टावर स्टोरी अन् महाविद्यालय प्रशासनाच्या जाचाला कंटाळून पूजाची आत्महत्या, संतप्त नातलगांची तोडफोड करीत ‘सीएमओ’ला मारहाण
किशोर कारंजेकर
वर्धा : – एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने महाविद्यालय प्रशासनाच्या जाचाला कंटाळून चक्क प्राचार्यांच्या कार्यालयासमोरील तीसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सावंगी मेघे येथे घडली. आपल्या मॄत्यूपूर्वी पूजा रजनी हिने इंस्टावर स्टोरी अपलोड करीत आत्महत्या केल्याने संतप्त झालेल्या नातलगांनी तोडफोड करीत सिएमओ यांना मारहाण केल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधला सावळागोंधळ मात्र यानिमित्ताने उजेडात आला.
सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये नागपूर येथील पूजा रजनी नामक विद्यार्थीनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती. तब्येतीच्या कारणांमुळे महाविद्यालयात सध्या ती उपस्थित नव्हती. येत्या दोन तारखेपासून परिक्षा असल्याने महाविद्यालय प्रशासन तीला परिक्षेला बसण्यासाठी आडकाठी निर्माण करीत होते. याकरिता तीने आज नागपूर येथून महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु त्यांनी तीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. शेवटी ती कशीबशी आपल्या वाहनातून महाविद्यालयात पोहचली. यावेळी तीला तीन विषयांत डिटेन केल्याचं कळले. यात फार्मसीलॉजी, पॅथालॉजी व मायक्रोबायोलॉजी या विषयांचा समावेश होता. गेल्या वेळी प्रथम वर्षाला पूजा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. परंतु यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या आडकाठीमुळे आपल्याला परिक्षेपासून वंचित राहावे लागणार, यामुळे ती व्यथित झाली. विनंती आणि विनवणी केल्यानंतरही तीचं कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी ती घायकुतीला आली आणि तिने इंस्टावर स्टोरी अपलोड करीत आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला.
आय क्विक “मैं मर रही हू..” अशा प्रकारची पोस्ट करीत तीने प्राचार्यांच्या कार्यालयासमोरील तीसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दरम्यान तीने आपल्या पालकांना देखील याविषयी माहिती दिली, त्यांनी तीला आम्ही लगेच पोहचतो असे सांगितले, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. महाविद्यालय प्रशासनाच्या दबावामुळे आणि दडपणामुळे तीने आत्महत्या केल्याचा आरोप पूजाच्या आईवडिलांनी केला आहे. येथील महाविद्यालय प्रशासन खूप “हरामी” असल्याचे देखील यावेळी पूजाच्या वडिलांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे येथील महाविद्यालय प्रशासनाने पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केले, यासंदर्भात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. येथील महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांत प्रचंड रोष आहे. परंतु त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून देखील प्रतिबंध लावण्यात आला हे विशेष..