Breaking
ब्रेकिंग

विधानसभा निवडणुकीचा खबरनामा : वर्धा मतदारसंघात बदलाचे वारे

2 7 8 0 7 3

प्रकाश कथले, वर्धा

वर्धा   :    जिल्ह्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नवी ठिणगी पडली आहे. पक्षा पक्षांत विभागलेले राजकारण, राजकीय पक्षांत पाचवीला पुजलेले अंंतर्गत मतभेद, याचवेळी जागे झालेले मतदार, यात न्याय, अन्यायाचा सोक्षमोक्ष लावायचा निर्धारच मतदारांनी केल्याचे दिसते. विशेषत: यात युवा मतदार आघाडीवर आहेत.`पारंपरिक गड पण लढाई अवघड`, अशी स्थिती जागृत मतदारांनी करून ठेवली आहे. अशात नवपर्व सुरू होऊ पाहात आहे. राजकारणातल्या कोलाहलाला मतदार वैतागल्याचे दिसते. अशा वातावरणात वर्धा विधानसभा मतदारसंघाचा हा सद्य;स्थितीचा आढावा! 

उमेदवारांनी समर्थकांसह त्यांचे नामांकन अर्ज सादर केले पण निवडणुकीत खरी रंगत राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी आणली आहे. मतदारांनी त्यांना दिलेली साद या नामांकन रॅलीतून दिसली. काहीतरी मोठ्या बदलाचे हे संकेत होते. उमेदवार डॉ. सचिन पावडे यांच्या रॅलीला जी जनसमर्थनाची साद दिसली, त्याचे संकेत वेगळेच आहेत.पारंपरिक उमेदवार, त्यांच्यातील चुरस, याला मतदार वैतागलेले दिसले. लोकसभा निवडणुकीपासून मतदार त्यांची शक्ती दाखवायला लागले.त्यांच्या निवडीत ते आपला माणूस शोधू लागले आहेत. त्यांना काही राजकीय दुकानदारी नकोशी झाली आहे.मतदारांनी त्यांच्या समस्या सोडवणुकीचे उत्तर शोधायला सुरुवात केली, हा लोकशाहीतला शुभसंकेत आहे. मतदारांना न्याय, अन्यायाची चाड आहे, हे वारंवार दिसत आहे.मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस गेलेत, हे मागील निवडणुकीने स्पष्ट केले आहे,आता मतदार पक्षांपलिकडे जाऊन आपला नेता, समस्या कोण मांडू शकेल, त्या सोडवू शकेल, हे शोधू लागले आहेत.

नामांकन अर्ज सादर करण्याकरीता निघालेल्या रॅलीत याची चुणूूक दिसली. डॉ. सचिन पावडे यांच्या रॅलीत ज्यांनी त्यांच्या यशस्वी आरोग्य उपचाराला सामाजिक कार्याची जोड दिली, त्यांची जाणीव दिसली. उणिवांची बेरीज नव्हतीच. डॉ. पावडे यांनी ओसाड टेकडीवर ऑक्सिजन पार्क उभे केले. गावोगाव आरोग्य शिबिरे घेत गोरगरिबांच्या कुपोषणग्रस्त मुलांवर उपचार केले, समाजकार्य समर्पित एक नवी सुदृढ युवा पिढी कळी उमलण्याच्या काळापासूनच सुरुवात केली, त्याची दखल घेताना नागरिक दिसत होते. कोविड काळात त्यांनी केलेले सेवाकार्य मतदार विसरलेले नाही. नागरिकांना स्वच्छ पाणी, खेळण्यास मैदान, सुंदर निसर्ग, प्रदुषणमुक्त जीवन,स्वच्छ चारित्र्याची ठेवण, थंडीत कुडकुडणार्‍या निराधारांच्या अंंगावर उबदार ब्लँकेट टाकण्याचा दरवर्षी राबविण्याचा उपक्रम, यामागे राजकीय स्वार्थ नव्हताच तर समाजहिताचा अर्थ होता. त्यांनी नेतृत्त्वाच्या स्पर्धेत उतरणे, यामागे मतदारांना चूक दिसली नाही. कुठेतरी निस्पृहपणे एक युवक आपल्या हिताकरीता राबायला, जीवनातील वेळ द्यायला समोर येतो आहे, हीच आपली गरज आहे, या भावनेने डॉ.पावडे यांच्या नामांकन रॅलीत नागरिक सहभागी झाले होते. ज्या लहान मुला, मुलींचे जीव वेळीच योग्य उपचार देऊन डॉ. पावडे यांनी वाचविले, त्यांच्या पालकांंकरीता नामांकन रॅलीतील सहभाग, हा कृतज्ञता सोहळा होता. त्यांच्या मंचावर नेता नव्हता. ते एकटेच बसले होते. खुल्या जीपमध्ये देवदैवस्पर्शाधिकारी ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अरुण पावडे तसेच मोजकीच मंडळी होती. हे दृश्य आगळे होते.डॉ.सचिन पावडे यांच्यात आपला माणूस दिसला, याचे ते द्योतक होते. निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर लागेल, कारण मतदार राजा आहे. तो काहीही लागला तरी जनमाणसांच्या हृदयाच्या अधिष्ठानावर डॉ.सचिन पावडे आरुढ झाले आहेत, याचा प्रत्यय नामांकन रॅलीने आला.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 7 8 0 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे