निंदण करताना शेतकरी महिलेस सर्पदंश, उपचारादरम्यान मृत्यू
गजानन बाजारे
कारंजा (घा) : – शेतात निंदण करताना सर्पदंश झाल्याने शेतकरी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मौजा गवंडी शेतशिवारात काल गुरुवारी घडली. पंचफुला भाऊराव चौधरी (वय६०) असे मॄतक महिला शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मॄतक महिला आपल्या मौजा गवंडी येथील शेतात गुरुवारी दुपारच्या सुमारास निदंण करीत होती. यावेळी दुपारी दिड वाजताच्या सुमारास त्यांना साप चावल्याचे लक्षात आले आणि लगेच भोवळ देखील आली. त्यामुळे त्यांच्या यजमानांनी त्यांना तत्काळ सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासणी केली असता सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मॄत्यू झाला. याप्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अशाप्रकारे शेतात निंदण खुरपणी करताना महिलेचा अचानक मॄत्यू झाल्याने गावात मात्र हळहळ व्यक्त होत आहे.