दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार ; साहसिक युवा जनशक्ती संघटनेचा उपक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – दैनिक साहसिकच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आज साहसिक युवा जनशक्ती संघटनेच्या वतीने तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक दिपचंद चौधरी विद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार स्वपनिल सोनवणे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, सेलू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नवीनबाबू चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तथा कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार, साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीनारायण पिल्ले आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांचा यशस्वी कारकिर्दीसाठी तर सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीनारायण पिल्ले यांचा उत्कृष्ट शालेय कार्यासाठी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच दैनिक साहसिकच्या सोळाव्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर सेलू तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यात भुमिका रुपवाणी, अखिलेश बंडे, विशेष निनावे, साई मुडे, अनुष्का लटारे, अनुष्का वैरागडे, वेदांती जायदे, नयन देवळीकर, विधी फाटे, प्राची धोंगडे, सेजल सोमनाथे, पायल तीतरे, कल्याणी राऊत, वेदिका बोकडे, सुशांत नाईक, रुचिका कामडी, वैष्णवी शेळके, मयुर नगराळे, उर्वशी बुधबावरे, स्वाती सोरते, आदित्य चांदनखेडे, पूर्वा गोडघाटे, सेजल सोमनाथे, साहिल दहीगव्हाणे, डिम्पल पटले, प्रणाली पिंपळे, मनिषा जगताप, दिक्षा हटवार, तन्वी पटले, निखिल दुरतकर, जयश्री चौधरी, समृद्धी राऊत यांचा समावेश आहे. त्यांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहसिक युवा जनशक्ती संघटनेचे सेलू तालुका प्रमुख सागर राऊत यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार अनिल वांदिले, सचिन धानकुटे, सतिश वांदिले, प्रकाश बडेरे, बाळा टालाटुले यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.