नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार अन् जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; दत्ता मेघे फाऊंडेशन आणि वर्धा सोशल फोरमचा उपक्रम

सचिन धानकुटे
सेलू : – दत्ता मेघे फाऊंडेशन आणि वर्धा सोशल फोरमच्या वतीने आज सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार तसेच येथील जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष जयवंतराव साळवे, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, माजी नगराध्यक्षा शारदा माहुरे, दफ्तरी ऍग्रो कंपनीचे तथा बाजार समितीचे संचालक वरुण दफ्तरी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रमोद आदमने, संचालक वरुण दफ्तरी, संचालक मुख्तार उर्फ गोलू शेख, संचालिका रेणुकाताई कोटंबकार, संचालक मनोज तामगाडगे, संचालिका राणीताई देशमुख यांच्यासह पोलीस खात्यात निवड झालेल्या साठे नामक तरुणाचाही शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी बाजार समितीच्या आवारातील शेड हे व्यापाऱ्यांच्या ताब्यातून काढून घेत ते शेतकऱ्यांच्या मालासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे संचालन मोहित सहारे यांनी तर संचालन डाखोळे यांनी केले.
या कार्यक्रमाला मोहीचे सरपंच अमर धोटे पाटील, सोंडीचे सरपंच संदेश धुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य अमित गोमासे, माजी नगरसेवक मंगेश वानखेडे, अमृतलाल व्यास, बबनराव येवले, रमणाचे सरपंच सचिन सोमनाथे, जुवाडीचे सरपंच अरविंद चाफले, माजी उपसरपंच रवींद्र बेसेकर, माजी उपसरपंच त्रिशूल राऊत, गौरव तळवेकर, शुभम लुंगे, आनंद जगताप, समिर डाखोळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.