ब्रेकिंग
“आरोग्याचे वाण” कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद ; दत्ता मेघे फाऊंडेशन व वर्धा सोशल फोरमचा उपक्रम
2
6
7
9
5
9
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या घोराड येथील भक्त निवासात दत्ता मेघे फाऊंडेशन आणि वर्धा सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने विशेषतः महिलांसाठी “आरोग्याचे वाण” नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
घोराड येथील भक्त निवास येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे यांच्या पुढाकाराने घोराड येथील भक्त निवासात “आरोग्याचे वाण” नामक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ७०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी विधवा महिलांना देखील आरोग्यासाठी वाण देण्यात आले. यावेळी मनीषा मेघे देखील प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
2
6
7
9
5
9