Breaking
ब्रेकिंग

सेलू येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी

2 2 5 4 6 3

सेलू : – स्थानीक स्कूल ऑफ ब्रिलियंटस् येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

     याप्रसंगी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना अतिशय सुदंर प्रकारे तयार करून कार्यक्रमाला सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापक राजेश डोंगरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करीत आपल्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य राजेश डोंगरे, पर्यवेक्षिका जयश्री येळणे, शिक्षक प्रतिनिधी निसार सय्यद तसेच शिक्षिका शहाना झिरिया तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 4 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे