नारायण चुन्याचा पांघरुणात वर्ध्याच्या आसाम टी कंपनीतून सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री : पुलगावात जय भोले, श्याम जर्दा होलसेल तंबाखू विक्रीचे केंद्र
किशोर कारंजेकर
वर्धा : महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या विक्रीवर बंदी लादण्यात आली आहेत. पण वर्धा जिल्ह्यात नेहमी उलटे बघायला मिळते. असाच गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रीचा गोरखधंदा उपाध्ये कंपनी आपल्या “नारायण चुना” या मुख्य व्यवसायाचा आडोसा घेऊन करित आहेत. तंबाखू, गुटखा विक्रीचे व्हिडीओ RNN कडे नाव प्रकाशित करण्याच्या अटीवर देण्यात आले आहे.
“नारायण चुना” हा उपाध्ये बंधुचा एक नंबरचा व्यवसाय. मसाळा येथे हा चुना बनविला जातो. तेथूनच या चुन्याची चिल्लर व ठोक विक्री होते. पण झटपट श्रीमंत होण्याची मनीषा बाळगणारे प्रफुल्ल ऊर्फ पप्पी उपाध्ये यांनी सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू केली आहे. नारायण चुना फॅक्ट्रीच्या गोदामातच तंबाखू, गुटख्याचा साठा केला जात असल्याने अद्याप पोलिसांना सुगावा नाही.
दयालनगरातील जितू गेलनी, रवि दानानी, मनिष देवानी, शंकर आसनानी हे सध्या आपला काळाबाजार यवतमाळ शहरातून करित असून तेही तंबाखूच्या काळ्या बाजाराचे मास्टरमाईंड आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकत सुरू असलेल्या तंबाखू आणि गुटख्याचा काळा बाजार चव्हाट्यावर आणण्यासाठी RNN ने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.
___________________________
S. P. साहेब… हे आहेत…
सुगंधित तंबाखू, गुटखा विक्रीचे ठोक व्यापारी
जय भोले किराणा (पुलगाव), श्याम जर्दा (पुलगाव), जितू गलानी, बन्सी गलानी, मोनू गलानी (पुलगाव), सुरेश पटेल, अशोक पवार (देवळी)
यातील श्याम जर्दा आणि जय भोले याच दोन्ही दुकानातून वर्धा जिल्ह्यातील गाव खेड्यात सुगंधित तंबाखू आणि गुटखा पुरविला जातो… हे विशेष.