Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यावर घुंगरू चोरणाऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला..! वडगांव(कला) येथील घटना

2 6 9 1 4 6

सचिन धानकुटे

सेलू : – बैलांच्या पायातील घुंगरू चोरणाऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला करीत शेतकऱ्याला जखमी केल्याची घटना नजिकच्या वडगांव(कला) येथे काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेलू पोलिसांत आरोपी संजय लटारे रा. वडगांव(कला) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, वडगांव(कला) येथील शेतकरी कवडू नत्थूजी मरसकोल्हे (वय५२) यांनी स्थानिक ग्रामपंचायत जवळ आरोपी संजय लटारे ह्यास तू बैलांच्या पायातील घुंगरू चोरून नेलेत, या कारणास्तव हटकले असता आरोपी संजय लटारे याने आपल्या हातातील कुऱ्हाडीने शेतकरी मरसकोल्हे यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत शेतकरी मरसकोल्हे यांच्या डाव्या हातावर कुऱ्हाड लागल्याने ते यात जखमी झाले. याप्रकरणी तक्रारीहून आरोपी संजय लटारे विरोधात सेलू पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८ (१), ३५२ बिएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सेलू पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे