Breaking
ब्रेकिंग

बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर..! धरपकड मोहीमेत तीन वाहनधारकांवर कारवाई

2 4 7 1 7 5

सचिन धानकुटे

सेलू : – नवनियुक्त ठाणेदार मंगेश भोयर यांनी शहरात आल्या-आल्याच टवाळखोर, मजनू आणि बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी धरपकड मोहीम हाती घेतली. सदर मोहीमे अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धोकादायक पद्धतीने वाहनं उभी करून अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहनधारकांवर भारतीय न्याय संहिताचे कलम २८५ नुसार कारवाई करण्यात आली.

      शहरात अल्पवयीन मोटारसायकल चालकांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. रहदारीच्या रस्त्यावर बेशिस्तपणे कर्णकर्कश हॉर्न वाजवत भरधाव मोटारसायकल चालवणं असे प्रकार नित्याचीच बाब झाली. रेहकी चौकात कालपरवा एका विद्यार्थीनीने विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालविल्याने मोठा अपघात घडला. सुदैवाने यात एका चिमुकलीचा जीव वाचला, मात्र तीच्या पालकांना मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने यात किरकोळ इजा झाली. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी तर रहदारीच्या रस्त्यावर धूम स्टाईलने गाडी चालवणारे अनेक महानुभाव शहरात आहेत. बसस्थानकावर देखील अशा टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात गोतावळा असतो. याठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये राडा होणे नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांसह मजनू आणि बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी ठाणेदारांच्या नेतॄत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून धरपकड मोहीम राबविण्यात येतेयं. शहरातील विविध चौकात ही मोहीम सातत्याने राबविल्या जात आहे.

   सदर मोहिमे अंतर्गत शहरातील मेडिकल चौक आणि विकास चौकात शुक्रवारी तीन वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मेडिकल चौकात रस्त्याच्या मधोमध वाहन उभे केल्याप्रकरणी ललित उमाशंकर मिश्रा, सेलू यांच्या एमएच ३२ बी ५९९३ या वाहनावर, तर ह्याच मेडिकल चौकात एमएच ४९ बी ८१२६ क्रमांकाच्या अखिल खॉं पठाण, पवनार यांच्यावर कारवाई करण्यात आली. यासोबतच विकास चौकात रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून अडथळा निर्माण करणाऱ्या हिंगणी येथील आरिफ शफी झरीया यांच्या एमएच ३२ बी २६८९ क्रमांकाच्या वाहनावर भारतीय न्याय संहिताचे कलम २८५ नुसार कारवाई करण्यात आली. सेलू पोलिसांच्या या धरपकड मोहीमेचे शहरातील नागरिकांकडून एकीकडे स्वागत करण्यात आले आहे, तर दुसरीकडे टवाळखोर, मजनू आणि बेशिस्त वाहनधारकांत याविषयी धडकी भरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे