Breaking
ब्रेकिंग

पुरस्कार फॉर अविष्कारचा विश्वकर्मा सन्मान सोहळा ; वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ खुशाल पठाडे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

1 9 8 3 7 0

सचिन धानकुटे

सेलू : – येथील डॉ आर जी भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ खुशाल पठाडे यांना नुकतेच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राध्यापक डॉ खुशाल पठाडे हे स्थानिक डॉ आर जी भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या अकरा वर्षांपासून ते शिक्षक तसेच संशोधक म्हणून काम करीत आहे. विशेष म्हणजे याकाळात त्यांचे २६ संशोधन निबंध विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकात प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या नावे तीन पेटेन्ट तसेच तीन संशोधन पुस्तके देखील प्रकाशित झालीत. त्यांच्या याच उत्कृष्ट शिक्षक व संशोधन कार्यासाठी त्यांना नुकतेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सिदवी फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार फॉर अविष्कार अंतर्गत त्यांना मानाचा विश्वकर्मा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला.
याकरिता त्यांचे विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ आर जी भोयर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कानोडे, सहकारी प्राध्यापक डॉ आशिष टिपले, डॉ अभिजित पाटील, डॉ वैभव पिंपळे सह महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 8 3 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे