वर्ध्यात ६ ऑगस्टला शिदोरी काला आणि सत्संग ; व्यसनमुक्ती सम्राट हभप खराटे महारांजाचे किर्तन ; माऊली परिवाराचा अधिकमासा निमित्त उपक्रम
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यातील माऊली परिवाराने अधिकमासाचे औचित्य साधत शहरात येत्या ६ ऑगस्ट रोजी शिदोरी काला आणि सत्संगाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे उर्फ खराटे महाराज यांच्या किर्तनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने माऊली परिवाराच्या आनंदाला उधाण आले आहे.
अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी ता.६ ऑगस्ट रोजी शहरातील आर्वी रोड, कारला चौकातील विठ्ठल रुख्मिनी सभागृहात शिदोरी काला आणि सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी सकाळी दहा वाजता व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर खोडे उर्फ खराटे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी व्यसनमुक्ती सम्राट हभप रामेश्वर महाराज खोडे आणि व्यसनमुक्ती प्रचारक हभप पवन महाराज खोडे प्रामुख्याने उपस्थित असतील. माऊली परिवारातील सदस्यांनी तसेच भाविकांनी कार्यक्रमाला येताना आपल्या सोबत शिदोरी आणावी असे आवाहन माऊली परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.