गजाभाऊच्या सत्कारापेक्षा वसुलीची चर्चा जास्त : 15 लाखांची वसुलीच्या खर्चातून होणार सत्कार
किशोर कारंजेकर
वर्धा : स्वयंघोषित शिक्षण दलाल व संस्था हडपणारा गजू कोटेवार याचा नवा फंडा समोर आला आहे. आपला वाढदिवस भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्याकरिता त्याने संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून सुमारे 15 लाख रुपये जमा केले, अशी जोरदार चर्चा त्याच्याच संस्थेतील सुत्रांनी कानी घातली आहे.
आजपर्यंत समाजसेवक म्हणून कार्य करणाऱ्या व हेमके गुरुजी यांची संस्था हडपणाऱ्या गजू कोटेवार याने सत्कार द्या म्हणून संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्या मागे सासेमिरा लावला.अखेर प्राचार्य केले म्हणून जाधव याने हा विडा उचलला.त्यानेही गजूचा सत्कार म्हणून वसुली सुरू केली, अशी चर्चा आहे. मी दहा लाख देवून प्राचार्य झालो, तर वसुली करणारच, असे स्पष्ट करीत त्याने इतर प्राध्यापक यांना दान मागितले.
कोटेवार यांना याविषयी व वृत्तपत्र जाहिरातीच्या नावे वसुली केल्याबाबत विचारल्यावर त्यांनी मी नाही जाधव यांना मागा, असे स्पष्ट उत्तर दिले. तर जाधव म्हणतात कोटेवारकडेच वसुली रक्कम असल्याचे सांगितले. या संस्थेत पद भरती करताना गजू याने कोट्यवधी रुपये कमावले. या संस्थेतील महिला कर्मचारी यासुद्धा अतिरिक्त कामाच्या आग्रहाने नाराज असल्याची चर्चा आहे.