टेन्व्हिक व अल्फा ड्रीम्स स्पोर्ट अकादमीचे पहिल्याच स्पर्धेत घवघवीत यश

किशोर कारंजेकर
वर्धा : – क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या टेन्व्हिक व अल्फा ड्रीम्स स्पोर्टस अकादमीने आपल्या पहिल्याच स्पर्धेत घवघवीत असे यश संपादित केले.
जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने ता. २९ व ३० जुलै रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नव्यानेच स्थापन झालेली टेन्व्हिक व अल्फा ड्रिम्स स्पोर्टस अकादमी पहिल्यांदाच सहभागी झाली होती. प्रशिक्षीत व व्यावसायिक कोचमुळे या स्पर्धेत घवघवीत असे यश मिळाले. यात व्रिद्धी बंग(१३ व १५ वर्षाखालील मुलींमधून दोन्हीत विजेती), अथर्व गुल्हाने(१५ वर्षाखालील मुलांमध्ये विजेता), यशस्विनी काळे(१७ व १९ वर्षाखालील मुलींमधून विजेती तसेच खुल्या प्रवर्गात विजेती), आर्या निंभोरकर(१९ वर्षाखालील मुलींमधून उपविजेती), ऋतुजा गिरी(मुलींमधून खुल्या प्रवर्गात उपविजेती), आश्रेया झोडे(११ वर्षाखालील मुलींमधून उपविजेती) आदि सर्व खेळाडूंचा समावेश आहे. यातील खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय पालकांना तसेच शुभम, पलाश व रोहीत सरांना दिले. खेळाडूंसाठी अद्यावत अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल दिनेश चन्नावार व आशीष झोडे यांना खेळाडूंनी धन्यवाद दिले.
सदर प्रतियोगिता घडवुन आणल्याबद्दल असोसिएशनचे पदाधिकारी राकेश पटेल, सुनील कालरा व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन शहा यांचे खेळाडूंनी आभार मानले.