Breaking
ब्रेकिंग

सहयोग बॅंकेच्या अभिकर्त्याचा खातेदारांना तीन लाखांचा गंडा ; अफरातफर उजेडात येताच ठेवीदारांच्या पैसे काढण्यासाठी बँकेसमोर रांगा

2 0 8 9 8 8

सचिन धानकुटे

सेलू : – शहरातील सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अभिकर्त्याने खातेदारांना जवळपास तीन लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून खातेदार तसेच ठेवीदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी चक्क बँकेच्यासमोर रांगा लावल्या आहेत.

       शहरात नव्यानेच उदयास आलेल्या सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा दैनिक अभिकर्ता म्हणून पोलीस ठाण्याच्या मागे राहणाऱ्या अजय पंडीत गई याची फेब्रुवारी २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्याने शहरातील बऱ्याच खातेदारांना सदर बँकेच्या नावाखाली खाते काढण्यास बाध्य केले. त्याच्याकडे जवळपास ४० खातेदार देखील गोळा झालेत. सुरुवातीला तो या सगळ्या खातेदारांचे नियमितपणे बँकेत पैसे जमा करायचा, परंतु दरम्यानच्या काळात त्याने ते पैसे बँकेकडे न भरता स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरलेत. त्यातीलच काही पैसे शेअर बाजारात देखील गुंतवले. सदर बाब बँक व्यवस्थापनाच्या लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात अभिकर्ता “अजय”ला तंबी दिली आणि एक महिन्याच्या आत सगळी रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. परंतु त्याने ती रक्कम बँकेच्या खात्यात जमा न केल्याने अखेर व्यवस्थापक यांनी नोव्हेंबर महिन्यात सेलू पोलिसांकडे यासंबंधी तक्रार दाखल केली.

     शहरातील जवळपास २९ खातेदारांचे तीन लाख रुपये याप्रकरणी अडकून पडले आहेत. शहरात नव्यानेच उदयास आलेल्या बँकेच्या या अफरातफर प्रकरणाची सध्या उलटसुलट चर्चा असून खातेधारकांसह ठेवीदारांनी बँकेच्या समोर आपल्या हक्काच्या पैशासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे